सोने-चांदीचे दर घसरले! 24 तासांत सोन्यात ₹6,000 तर चांदीत ₹7,000 ची घसरण

जळगाव : दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्यानिमित्त जळगावातील सराफा बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली. शुभ मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या दरात तब्बल घसरण झाली असून, केवळ 24 तासांत सोन्याचे दर ₹6,000 नी आणि चांदीचे दर ₹7,000 नी कमी झाले आहेत.

दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर ₹6,000 नी आणि चांदीचे दर ₹7,000 नी घसरल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी वगळता सोन्याची किंमत ₹1,23,000 पर्यंत खाली आली असून, चांदीची किंमत ₹1,58,000 च्या आसपास स्थिरावली आहे.

जीएसटीसह सोन्याचे दर ₹1,28,200 वर आले आहेत, तर चांदीचे दर ₹1,64,800 पर्यंत घसरले आहेत. दरात झालेल्या या अचानक घसरणीमुळे सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीत रस असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट विस्कळीत झाले होते. परंतु या घसरणीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्वेलर्सच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता, डॉलर-रुपया विनिमय दरातील बदल आणि वाढत्या तेलाच्या किमती हे घटक सोन्याच्या दरातील चढ-उतारास कारणीभूत ठरत आहेत.

👉 थोडक्यात:

  • 24 तासांत सोन्याचे दर ₹6,000 नी आणि चांदीचे दर ₹7,000 नी घसरले

  • जीएसटीसह सोन्याचे दर ₹1,28,200 वर

  • चांदीचे दर ₹1,64,800 वर

  • ग्राहकांना मोठा दिलासा, बाजारात वाढली गर्दी