शाहरुख खानचे ‘हे’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार; ३१ ऑक्टोबरपासून ‘द शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हल’

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या ६०व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट देत आहे. येत्या २ नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस असून, त्याच्या या विशेष दिनानिमित्त ‘द शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल ३१ ऑक्टोबरपासून देशभरातील निवडक चित्रपटगृहांमध्ये सुरू होणार आहे.

शाहरुख खानने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याने लिहिलं आहे, “माझे काही चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. मी तेव्हा जसा होतो तसाच आजही आहे — फक्त केस थोडे बदलले आहेत आणि आता मी आणखी छान दिसतोय!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानचे गाजलेले चित्रपट जसे की ‘मै हू ना’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘देवदास’, ‘दिल से’, ‘कभी हा कभी ना’, ‘जवान’ आणि ‘ओम शांती ओम’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहेत.

या चित्रपटांनी प्रदर्शित होताना प्रेक्षकांकडून अफाट प्रतिसाद मिळवला होता आणि आजही या चित्रपटांची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे — आपल्या आवडत्या कलाकाराचे हे कालातीत चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची.