Maharashtra Solar Agriculture Scheme
महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकर्यांसाठी मागेल त्याला कृषि सौरपंप (Magel tyala saur Pump) ही योजना आणली आहे. सरकारने या योजनेची अंबलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल देखील उपलब्ध करून दिले आहे. सरकारने मागेल त्याला कृषि सौरपंप या नवीन योजनेची मुंबई येथे झालेल्या सभेत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकर्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
मागेल त्याला कृषि सौरपंप या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना कृषि सौर पंप घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.सर्व शेतकर्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकर्यांना माफक दरात सौर कृषिपंप उपलब्ध करून देणे. त्यामुळे सिचांनासाठी दिवसा वीजपुरवठा होईल. विजबिल नाही आणि लोडशेडिंगची चिंता नाही. राज्यातील शेतकर्यांना सरकारकडून अनुदान तत्वावर 3 ते 7.5 hp चे पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
योजनेच्या लाभासाठी पात्रता
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी पात्र.
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
पात्र शेतकर्यांना 3 ते 5 hp चे पंपांचेअनुदान तत्वावर वाटप
5 वर्ष सरकारकडून देखभाल दुरुस्तीची विमा संरक्षणासाह हमी देण्यात येणार आहे.